शासकीय उपक्रमाचा खर्च सर्वसामान्यांच्या माथी - राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची टीका

शासकीय उपक्रमाचा खर्च सर्वसामान्यांच्या माथी - राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची टीका

मुंबई | प्रतिनिधी

राज्य सरकारकडून गाजावाजा करण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाचा खर्च सर्वसामान्यांच्या माथी मारण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी केली. येत्या काही दिवसात राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम बीड जिल्हयातील परळी येथे होऊ घातलेला आहे. मात्र सरकारच्या या कार्यक्रमावर केल्या जाणाऱ्या वारेमाप खर्चावरून 'शासन आपल्या दारी... खर्च देखील सर्व सामान्यांच्या माथ्यावरी...' असे ट्विट करत जयंत पाटील यांनी सरकारच्या उपक्रमावर टीका केली आहे.

परळी येथील नियोजित कार्यक्रमाच्या मंडपासाठी जवळपास २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागवण्यात आली आहे. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार १०० रुपयांची निविदा आहे. बाजूच्या मंडपासाठी ६० लाख १४ हजार १४० रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. तर इलेक्ट्रिक कामांसाठी ७९ लाख ८२ हजार ५१० रुपयांची निविदा मागवण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

शासकीय उपक्रमाचा खर्च सर्वसामान्यांच्या माथी - राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची टीका
Ayodhya Ram Mandir : मंदिराचे खोदकाम सुरु असताना आढळले प्राचीन अवशेष

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात १७ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेला सुद्धा भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला होता. आता शासन आपल्या दारी उपक्रमासाठी देखील तोडीसतोड मंडप उभारण्याचे नियोजन आहे. मात्र यंदा खर्च करदात्यांच्या खिशातून केला जाणार आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com