राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी गफ्फार मलिक अनंतात विलीन

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह समाजबांधवांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी गफ्फार मलिक अनंतात विलीन

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्यावर मंगळवारी दुपारी ईदगाह मैदानावर नमाजपठण करुन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक (वय 70) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

आज मंगळवारी काट्याफाईल येथील त्यांच्या राहत्या घरापासून दुपारी 2 वाजेच्यासुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हाजी गफ्फार मलिक यांचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान असल्याने त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. त्यांच्या अकस्मित जाण्याने शोककळा पसरली होती.

पदाधिकार्‍यांनी घेतले अंतिम दर्शन

पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, मनपा विरोधीपक्षनेते सुनिल महाज, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह राजकीयसह सर्वच क्षेत्रातील पदाधिकार्‍यांसह नेतेमंडळी उपस्थित होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित असल्याने पोलिस प्रशासनाकडून तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com