Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याK Chandrashekar Rao : पंढरपुरात येण्याआधी चंद्रशेखर राव यांचा मटणावर ताव, मिटकरींचा...

K Chandrashekar Rao : पंढरपुरात येण्याआधी चंद्रशेखर राव यांचा मटणावर ताव, मिटकरींचा आरोप

मुंबई | Mumbai

तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनं (बीआरएस) राजकीय विस्तारासाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. आगामी निवडणुकाही ते लढणार असून त्यासाठी जोरदार तयारीही सुरू केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. केसीआर तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि इतर नेत्यांसह पंढरपूला येणार आहेत. या दौऱ्याच्यानिमित्ताने केसीआर यांच्याकडून मोठं शक्तिप्रदर्शन केले जात आहे. वाटेत त्यांनी उमरगा येथे भोजन घेऊन सायंकाळी सहा वाजता सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसीआर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मटनाचा शाही बेत! पंढरी वारिवर असताना मुख्यमंत्री केसीआर हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनाशी खेळू नका? पंढरपूर येताना १० हजार वेळा विचार करा. पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका. माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, केसीआर पंढरपूरला येत आहेत. वाटेत ते तेलंगणाहून पंढरपूरला येताना धाराशिवमधील उमरगा येथे थांबतील. तिथे हा मटणाचा बेत आखण्यात आला आहे. तिथे मटणाची पार्टी करून ते रात्री सोलापूरला मुक्कामी असतील. मुळात कोणी काय खावं, काय प्यावं यावर आमचं काही मत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु ते सोलापूर मुक्कामी असताना, एकीकडे अबकी बार किसान सरकार हे होर्डिंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. वेलकम टू महाराष्ट्र असे होर्डिंग्स लावले आहेत. या होर्डिंग्सवर पांडुरंगाची लावलेली प्रतिमा पाहून वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यांनी अवश्य मटणाचा बेत करावा, दारुचा बेत करावा, त्यावर आमचं काहीच मत नाही. आपले वारकरी दारू आणि मटणाला निषिद्ध मानतात. या महाराष्ट्राला वारीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी वारकऱ्यांच्या भावनांशी कृपा करून खेळू नये. जर असं काही केलं तर उद्या तरी त्यांनी पथ्य पाळावं. उद्या त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना येताना आणि जाताना मटणाचा बेत करण्यापासून दूर ठेवावं. आमच्या वारकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. अन्यथा वारकरी ही गोष्ट लक्षात ठेवतील, असंही मिटकरी म्हणाले.

भरदिवसा ४ बंदुकधाऱ्यांनी कार अडवून उद्योजकाला लुटलं, थरारक घटनेचा Video Viral

केसीआर यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ते काहीवेळापूर्वीच धाराशिवच्या उमरगा येथे दाखल झाले. तेथून केसीआर, तेलंगणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार असा ताफा सोलापूर येथे दाखल होईल. सोलापूरात दाखल होताना केसीआर यांच्यासोबत तब्बल ६०० गाड्यांचा ताफा असेल, अशी माहिती आहे. केसीआर आज सोलापूर येथे मुक्काम करणार असून उद्या सकाळी विठुरायाचे दर्शन घेतील. भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सोलापुरात मुक्कामासाठी शहरातील विविध हॉटेल्समध्ये २२० रूम बुक करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे उद्या के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भगीरथ भालकेंनी भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवला सामोरं जावं लागलं. त्यानंतर पक्षात राहून आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात होती, असा आरोप भालकेंनी केला होता. अशातच काही दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शरद पवारांनी अभिजीत पाटलांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे भगीरथ भालके नाराज झाल्याची चर्चा असून ते भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या