Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या‘एंटी चेंबर’ ते ‘कुलू मनाली’! जितेंद्र आव्हाड-चित्रा वाघ यांच्यात ‘राजकीय दंगल’, नेमकं...

‘एंटी चेंबर’ ते ‘कुलू मनाली’! जितेंद्र आव्हाड-चित्रा वाघ यांच्यात ‘राजकीय दंगल’, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांची चिखल फेक चालू आहे. यात सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात ‘ट्विट’वार रंगलं आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

कोल्हापुरातील दंगलीवरून मविआ नेत्यांकडून टीका झाली. या टिकेला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, सत्ता काय गेली, सत्तेबरोबर मतीही गेली… आजकाल मविआच्या नेत्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला दिसतोय की, त्यांचा जीभेवरही ताबा राहिलेला नाही. पत्रकार परिषदेत जाहीररित्या शिवीगाळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा मेंदूही त्यांच्या स्वभावाप्रमाणं सडत चाललाय. अशा विकृतींना वेळीच आवर घाला आणि यांना येरवड्याच्या रूग्णालयात दाखल करा.

जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या ट्वीटला रिट्विट करून म्हटले आहे की, ताई मी कुठली शिवी दिली नाही. मला फक्त मम्मी कुणाची हे तोंड उघडायला लावू नका. मी तुमची खूप इज्जत करत आलो आहे. तुम्हारे शिशे के घर पे हम पत्थर मार सकते है. हमाम में सब नंगे है. BA पूर्आर्मस्ट्राँग आठवत असेल ना. यापुढे स्वभावाप्रमाणे वागीन. अँटी चेंबरमधले ‘विनोद’ आता बस. यामध्ये विनोद शब्दावर जोर दिला आहे. आपण खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलता. माझा स्वभाव आपल्याला माहिती आहे. मी सहन करतो. बहिणीला सांभाळून घेत आलो. पण, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे.

यावर प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, माझ्या राजकीय मुद्दयांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कु मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेल हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्महत्या होती की हत्या केली? तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी. तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला? हेही लपून राहिलेल नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील. मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणारा गिधाड आहेस तू तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आताही तुम्हाला पुरून उरणार आव्हाड नाहीसच तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे. राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव.’ असा हल्लाबोल वाघ यांनी आव्हाडांवर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या