गावाकडे येणार्‍यांनी करोना सोबत आणला
राजकीय

गावाकडे येणार्‍यांनी करोना सोबत आणला

ना. जयंत पाटील : लॉकडाऊनच्या आधी जनतेला गावी जाण्यास चार दिवसांची सवलत हवी होती

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

करोना संकटाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. ज्यावेळी लॉकडाऊन झाला त्यावेळी करोना संसर्ग ग्रामीण भागात पोहचला नव्हता. लॉकडाऊन करण्याअगोदर चार दिवस वेळ दिसला असता तर सर्वजण आपआपल्या गावी पोहचले असते. आपल्याकडे उलटे झाले असून लॉकडाऊनमध्ये अनेक लोक पायी घरी, गावाकडे गेले, सोबत करोनाही घेऊन गेले. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीचे भवन येथे नगर दक्षिण पदाधिकार्‍याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.संग्राम जगताप, आ.निलेश लंके, माजी आ. राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, घनश्याम शेलार, दादाभाऊ कळमकर, नरेंद्र घुले, अशोक बाबर, अभिजत खोसे, संध्या सोनवणे, सोमनाथ धुत, प्रशांत गायकवाड, निर्मला मालपाणी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष आ.पाटील म्हणाले, आपल्याकडील हॉस्पिटलमध्ये खाटा कमी तर रुग्ण संख्या जास्त आहे. कमी लक्षणे असलेल्या रुग्णाची संख्या जादा आहे. दरम्यान रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईपेक्षा पुणे, सोलापूर, पिंपरीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. शहरातील लोकांना गावाकडे जाण्याची परवानगी दिली यामुळे रुग्ण संख्या वाढली.

नगर दक्षिणमध्ये पक्षाल चांगले यश मिळाले आहे. पक्षाने कार्यकर्त्यांकडून पक्षाबद्दल अभिप्राय मागवले होते. त्यात 9 लाख 14 हजार कार्यकर्त्यांनी अभिप्राय नोंदविला आहे. नगर जिल्हा हा शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. काही महिन्यानंतर सर्व मतदार संघाचा दौरा करणार असून त्यातून प्रत्येक मतदारसंघाचे निरीक्षण केले जाणार आहे.

यावेळी बोलताना राजेंद्र फाळके म्हणाले, जिल्ह्यात कार्यकर्तेची खाण आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नगरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यात त्रास देणारी व्यक्ती या जिल्ह्यातीलच आहेत. यामुळे नगरवर लक्ष देण्याची गरज आहे. पक्षाने पाठबळ दिले तर जिल्ह्यातील दहा जागा निवडून येतील, असा दावा त्यांनी केला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com