Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांची बाजु भक्कम; जयंत पाटील स्पष्टच बोलले

शरद पवारांची बाजु भक्कम; जयंत पाटील स्पष्टच बोलले

कोल्हापुर | Kolhapur

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असे कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत (Ajit Pawar Group) जात आहेत, हे मी प्रसार माध्यमांमधूनच ऐकत असल्याचे जयंत पाटील(Jayant Patil) यांनी म्हटले आहे. अखेर यावर आता जंयत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असे सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेच्या बाबतीत भाष्य केले आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र करून दिले आहे ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

शरद पवारांच्या २५ वर्षाच्या नेतृत्वामुळे आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळालेली आहे. त्यावेळी शरद पवार साहेबांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही. आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारांवर देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो भारतातील जनता मान्य करेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकही अजित पवार गटाच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे. याबद्दल जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी तीन वाक्यात उत्तर देत सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. त्यामुळे ते असे कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जात आहेत असे प्रसारमाध्यमांमधून मीच ऐकले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील टोला लगावला आहे. राहुल गांधींना बारामतीत आणायचे कारण नाही, एकटे शरद पवारच काफी आहेत. काही आमदार गेले म्हणून जनाधार गेला असे समजण्याचे कारण नाही, नाहीतर बावनकुळेंना दारोदारी जाऊन पुढचा पंतप्रधान कोण असे विचारायची पाळी आली नसती, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या