Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी कधी? निवडणूक आयोगात नेमकं...

NCP Crisis : आजची सुनावणी संपली, पुढील सुनावणी कधी? निवडणूक आयोगात नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आज निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीला शरद पवार उपस्थित होते. तर अजित पवार गटाकडून कोणतेही नेते हजर नव्हते. यावेळी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला.

- Advertisement -

अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. दोन्ही गटाकडून खरा पक्ष आपलाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता पुढील सुनावणी ९ तारखेला दुपारी चार वाजता होणार आहे.

“शरद पवार आपल्या मर्जीनुसार…”; निवडणूक आयोगात अजित पवार गटाचा गंभीर आरोप

या सुनावणीत आधी अजित पवार गटाच्या वकिलांनी बाजू मांडली. अजित पवार गटाकडून १ लाख ६२ हजार प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात दाखल करण्यात आले. तसेच आमच्याकदे ५३ पैकी ४३ आमदार आहेत. धानपरिषद ९ पैकी ६ आमदार, नागालँडचे ७ आमदार आमच्याकडे असल्याचे अजित पवार गटाने सांगितले आहे.

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत. एक गट बाहेर पडला आहे. मात्र मूळ पक्ष आमच्यकडेच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. शरद पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांचीदेखील आज भेट घेतली आहे. आता पुढील सुनावणी ९ तारखेला पार पडणार असून या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर

- Advertisment -

ताज्या बातम्या