West Bengal Election Results 2021 : शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

पश्चिम बंगालमध्ये परत एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार का भाजप आपली सत्ता आणणार? हे चित्र आज स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

या निवडणुकीच्या मतमोजणी कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने २०० जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस २०८ जागांवर पुढे असून भाजपच ८० जागांवर पुढेआहे. यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्वीट करत पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

West Bengal Election Result 2021 : बंगालमधील सर्व जागांचे कल हाती; प्रशांत किशोर यांचा ‘तो’ दावा चर्चेत

शरद पवार यांनी म्हंटल आहे की, ‘या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच करोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात,’

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात २९४ जागांसाठी २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. सत्ता स्थापनेसाठी १४८ जागांची आवश्यकता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *