शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

सुमारे 40 मिनिटे झाली चर्चा
शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे बैठक झाली.

या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली यासंदर्भात अधिक माहिती समजू शकली नाही.

मात्र, या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडी तसेच केंद्र सरकारकडून राज्याला कोविड 19 संसर्गाच्या काळात मिळणारी तोकडी मदत, एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com