अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र आले होते. आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार (Prataprao Pawar) यांच्या घरी शरद पवार आणि अजितदादा (Ajit Pawar Meets Sharad Pawar) यांची भेट झाली. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते. अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत.

शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी या भेटीबद्दल विचारले, त्यावेळी ते म्हणाले की, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुख, समृद्धी भरभराटीच जावो” अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या दिल्लीत दौऱ्याबद्दल बोलणे शरद पवार यांनी टाळले.

अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
वंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांचं पुण्यातील बाणेर परिसरात निवास्थान आहे. आज दुपारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार पोहोचले होते. या तासभर चर्चा केल्यानंतर शरद पवार हे प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडले.

अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
''शरद पवारच खरे ओबीसी नेते''; बच्चू कडूंचे विधान

दरम्यान, अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झालेत. अजित पवार दिल्लीत अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांना डेंग्यु झाला होता. त्यामुळे मागच्या काही दिवसात ते दिसले नव्हेत. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता अजित पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात कौटुंबिक भेटीत काय चर्चा झाली? दिल्ली भेटीचा उद्देश काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com