शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?

पुणे | Pune

२०२४च्या लोकसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या असताना राज्यातल्या आघाड्यांमध्ये जागावाटप कसं होणार? याचबरोबर कोणत्या जागेवरून कोण निवडणूक लढवणार? यावरही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नसताना शिरूर लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार? यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

याच दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिरूरमधून कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आज पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?
Biggest Train Accidents In India : भारतातील भीषण रेल्वे अपघात, ज्यांनी देशाला हादरवून सोडले... वाचा, कधी अन् कुठे झालेत अपघात?

याबाबत कोल्हे म्हणाले की, आज पवार साहेबांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. 'साहेब सांगतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण' असणार आहे .कला क्षेत्रात काम करत असताना राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वच विषयावर इतर सर्व पक्षातील नेते मंडळींची भेट होत असते.यातून वेगळं कोणताही अर्थ काढू नये .माणूस महत्त्वाचं नसून पक्ष महत्त्वाचं आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल अस देखील यावेळी कोल्हे म्हणाले. २०१९ साली जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा प्रश्न वेगळे होते. आणि आज त्यातील 2 प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. आज महाविकास आघाडी म्हणून मोठी ताकद सोबत असल्याने येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असं देखील यावेळी कोल्हे म्हणाले.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?
Odisha Train Accident : माणुसकी अजूनही जिवंत आहे! रेल्वे अपघातातील जखमींच्या मदतीसाठी हजारो रक्तदात्यांची रुग्णालयांमध्ये गर्दी

दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना विलास लांडे म्हणाले, अमोल कोल्हे यांनी आता वर्षभरात त्यांचा जनसंपर्क वाढवावा आणि निवडणुकीला लोकांसमोर जावे. शरद पवार आणि अजित पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहणार अजून वर्ष बाकी आहे. त्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची याबाबत अजून कुठेही स्पष्ट झालेले नाही, मात्र पक्षाची जबाबदारी दिली ती मी पार पाडेन.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला?
Odisha Train Accident : ओडिशातील रेल्वे अपघातानंतर घटनास्थळी परिस्थिती काय? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

शिरूर लोकसभा मतदारसंघात विलास लांडे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख करणारे बॅनर्स झळकले होते. या बॅनर्सवरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. अमोल कोल्हेंचा जनसंपर्क कमी पडत असल्याचीही चर्चा रंगली होती. यासंदर्भात अखेर आज शरद पवारांच्या उपस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाली. ही उमेदवारी आता अमोल कोल्हेंनाच मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com