Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटात इतके आमदार कसे?; काँग्रेस-राष्ट्रवादीची शंका

शिंदे गटात इतके आमदार कसे?; काँग्रेस-राष्ट्रवादीची शंका

मुंबई | Mumbai

शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार संकटात आले आहे. पण, एकनाथ शिंदेंकडे एकाचवेळी इतके आमदार कसे काय? अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने व्यक्त केली आहे….

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके सेनेचे आमदार कसे? यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीत शंका व्यक्त केली जात आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात आमदारांमध्ये असंतोष कसा?, असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे.

काल उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शासकीय ‘वर्षा’ (Varsha) निवासस्थान सोडले. ते मातोश्री (Matoshri) या आपल्या निवास्थानी काल दाखल झाले. मुख्यमंत्री मातोश्रीवर आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळेच आम्ही हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच सरकारला कसे वाचवायचे? यावरच ही महत्वपूर्ण बैठक पार पाडत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या