Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकाय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?; मिटकरींनी तानाजी...

काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?; मिटकरींनी तानाजी सावंतांना डिवचले

मुंबई | Mumbai

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना त्यांच्या मुंबई-पुणे-मुंबई दौऱ्यावरुन सध्या सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर त्यांच्या दौऱ्याचे फोटोही व्हायरल होत असून घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर, तसेच राखीव असा हा दौरा असल्याचे दिसून येते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये मिटकरी म्हणाले, ”हे आहेत आमचे आरोग्य मंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! ” काय ते मंत्री ? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?? एकदम OKK OKK” असे म्हणत त्यांनी सावंत यांना डिवचले आहे.

तसेच अमोल मिटकरी यांनी ट्विट सोबत तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्याची कार्यक्रम पत्रिकाच शेअर केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट यादरम्यानच्या पुणे दौऱ्याचं नियोजन नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये तानाजी सावंत २६ तारखेला दुपारी अडीच वाजता मंत्रालयातून पुण्याच्या दिशेने निघाले असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर २७ आणि २८ ऑगस्ट या दोन दिवसांत तानाजी सावंत यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त निवासस्थान ते कात्रज, बालाजी नगर येथील कार्यालये असाच प्रवास नमूद करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या