Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेमुळे मुंबई टिकली, हेच नेमके काहींच्या डोळ्यांवर आले; वज्रमूठ सभेत अजित पवार...

शिवसेनेमुळे मुंबई टिकली, हेच नेमके काहींच्या डोळ्यांवर आले; वज्रमूठ सभेत अजित पवार यांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी अजित पवार यांनी तडाखेबाज भाषण केलं. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीला एकत्र राहून निवडणुका लढवण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे.

- Advertisement -

‘मुंबईचं मराठीपण टिकवण्यासाठी कुणी काम केलं असेल तर ते हिंदुह्रदयसम्राट बाळाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हेच काही लोकांना पटत नाही. त्यामुळे त्यांनी फोडायचं राजकारण सुरू केलं. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान योग्य राहणार का, कायदा राहणार का, घटना राहणार का, याचा विचार केला पाहिजे’, असं अजित पवार म्हणाले.

चर्चा तर होणारच! वज्रमूठ सभेत अजित पवारांवर बोलतांना राऊत म्हणाले, “दादा येणार, दादा बोलणार, दादा जिंकणार”

पोटनिवडणुका असेल किंवा बाजार समिती निवडणुकीत आपण चांगलं यश मिळवलं असून जनता आपल्यासोबत आहे. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. कोरोनाच्या संकटात आपण चांगलं काम केलं. आर्थिक शिस्त आम्ही कुठेही मोडली नाही. 31 मार्च 1 हजार कोटींची बिलं या सरकारने देण्याची थांबवली आहे. कंत्राटदारांना यांनी थांबवलं, कोण याला जबाबदार आहे? असा सवाल अजित पवारांनी विचारला.

घटनाबाह्य सरकार कोसळणारच, मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचा डाव; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे, पण त्यांना मदत करण्याची सरकारीच भूमिका नाही. शिंदे फडणवीस काय करत आहेत? त्यांचं काम नाही का? शेतकऱ्यांची पिक उद्धवस्त झाली आहेत, परंतु, त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. फडणवीस शिंदे काय करत आहेत, त्यांचं हे काम नाही का? पण यांना बाकीच्या कामांमध्ये रस आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.

सरकारला 10 महिने झाले आहे, पण हे सरकार निवडणूक घेत नाही. या सरकारला निवडणुकींची भीती वाटत आहे. निवडणुका का घेत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाही. भीती कशाची वाटत आहे. का तुम्ही निवडणुका जाहीर करत नाही. आता तर पाऊसपण नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर जनता काय करेल, याचा विश्वास या सरकारला नाही. म्हणून शिंदे सरकार निवडणुका घेत नाही, असा आरोपही अजित पवारांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या