Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या“समीर दाऊद वानखेडे...”; फोटो ट्विट करत मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

“समीर दाऊद वानखेडे…”; फोटो ट्विट करत मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

कॉर्डिलीया क्रूझ प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत असून हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. आधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक गौप्यस्फोटांनंतर…

- Advertisement -

आता काल रविवारी या प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच महत्त्वाचे बनले आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी आज एक फोटो ट्विट करत समीर वानखेडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांनी आज आणखीन एक नवीन आरोप करत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाबाबतचा खुलासाच केला आहे. मलिक यांनी वानखेडे यांचे पहिले नाव हे समीर दाऊद वानखेडे असे असल्याचे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

तसेच मलिक यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेचा एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, हा कागद पोस्ट करताना मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांच्या फर्जीवाडा इथूनच सुरू झाला असं म्हटलं आहे.

दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याचा हा व्हिडिओ आहे. ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी १८ कोटींची डील जवळपास फायनल झाली होती. शाहरूख खानच्या मॅनेजरसोबत मिटिंग देखील झाली होती. त्यातले ८ कोटी समीर वानखेडेंना दिले जाणार होते, असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे.

समीर वानखेडे यांनी याबाबत आरोप फेटाळले आहेत. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. अज्ञात व्यक्तींकडून कायदेशीर कारवाईचा खटाटोप असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या