मुंबई ड्रग्स प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई ड्रग्स प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई | Mumbai

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नवाब मलिक (Nawab Malik) यांची कन्या निलोफर मलिक (Nilofer Malik) यांनी कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली आहे. फडणवीसांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे...

मुंबई ड्रग्स प्रकरणावरून (Mumbai Drugs Case) सध्या राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला.

नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी नवाब यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याचा तसेच त्यांच्या जावयाच्या घरात अमली पदार्थ सापडल्याचा दावा केला होता. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांचे अंडरवल्ड कनेक्शन असल्याचे आरोप प्रत्यारोप केले.

दरम्यान, क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकर यांनी मंगळवारी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नवाब मलिक आणि निशांत वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आज देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फडणवीसांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा दावा त्यांनी केला आहे.

याबाबत निलोफर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, खोटे आरोप एखाद्याचे जीवन उद्धवस्त करू शकतात. त्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी आपण काय आरोप करत आहात, हे जाणून घेतले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबाबत केलेले आरोप खोटे आहेत. त्याबाबत त्यांना मानहानीची नोटीस देण्यात येत आहे. या प्रकरणात आम्ही मागे हटणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.