Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप आमदारांनी रामाची जमीनही लाटली; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

भाजप आमदारांनी रामाची जमीनही लाटली; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

नवाब मलिक यांनी राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्याची सविस्तर माहिती पत्रकारपरिषदेत दिली. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जमीन घोटाळा प्रकरणात ११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नांदेड, औरंगाबाद, बुराहण शाह वली परभणी, जालना, पुणे, बदलापूर, औरंगाबाद, आणि बीडमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. जमीन घोटाळा झालेल्या दहा देवस्थानांपैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थाने आहेत.

आष्टी मुस्लीम देवस्थानाच्या ३ जागा आणि हिंदू देवस्थानाच्या ७ जागा बेकायदेशीरपणे खालसा करून लाटण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू देवस्थानच्या ३०० एकर जमिनीचा समावेश असून मुस्लीम दर्गा आणि मशिदीच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. देवस्थानांच्या जमिनीचा मालकी कधीही बदलता येत नाही. पण एकूण ५१३ एकर जमिनीचा हा घोटाळा झालाय, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

‘या’ ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

यावेळी नवाब मलिक यांनी आष्टीतील देवस्थान जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुरेश धस यांच्यावर आरोप केले. या घोटाळ्यात मच्छिंद्र मल्टीस्टेट सोसायटीचा समावेश आहे. या सोसायटीच्या माध्यमातून देवस्थानांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. सोसायटीत असणाऱ्या सदस्यांच्या खात्यात पैसे गेले. यामधून खरेदी खत करण्यात आले. याप्रकरणी राम खाडे यांनी ‘ईडी’कडे केलेल्या तक्रारीत सुरेश धस आणि भीमराव दोंदे यांचे नाव असल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Happy Birthday Tamannaah : ‘मिल्क ब्युटी’ तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल…

दरम्यान नवाब मलिक यांच्या या आरोपाला सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. माझी संपत्ती चार कोटीची आहे. मलिक यांनी माझी संपत्ती घ्यावी. मला पाच पन्नास द्यावेत म्हणजे माझे कर्ज तरी फिटेल असं सांगतानाच मलिक यांच्यावर मला आता अब्रुनुकसानीचा दावा करावा लागेल, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला आहे.

Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ का म्हणतात?

- Advertisment -

ताज्या बातम्या