धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव! मलिकांचा वानखेडेंवर आरोपांचा नवीन बॉम्ब

धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव! मलिकांचा वानखेडेंवर आरोपांचा नवीन बॉम्ब

मुंबई l Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे.

नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा ट्विटरवरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव! म्हणत नवाब मलिकांनी काही कागदपत्र ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

“अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्रं शेअर केली आहेत.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या आई झहेदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मृत्यूचे दाखले शेअर केले आहेत. १६ एप्रिल २०१५ रोजी झहेदा यांचं निधन झाल्याचा उल्लेख या दाखल्यात आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी यावेळी या दोन्ही दाखल्यांवर उल्लेख असलेल्या धर्माकडे लक्ष वेधलं आहे. एका दाखल्यावर मुस्लिम असा उल्लेख असून दुसऱ्या दाखल्यात हिंदू असा उल्लेख आहे.

दरम्यान, नवाब मलिकांनी केलेल्या या आरोपानंतर या प्रकरणात आता आणखी काय समोर येणार? आणि आता या आरोपांवर समीर वानखेडे काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com