नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप

नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत.

विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा (Drugs) खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज (सोमवार) अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा एक फोटो ट्विट करत 'या' ड्रग्स पेडलरचं (Drugs peddler) भाजपसोबत (BJP) कनेक्शन काय? असा सवाल केला आहे.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मलिक नवाब मलिक म्हणाले, 'फडणवीस सरकारच्या (Fadnavis govt) काळात नीरज गुंडे (Niraj Gunde) देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मांडवलीसाठी भेटायचा. सरकार सुरू असताना फडणवीस आणि ठाकरेंचे नाते बिघडत होते. त्यावेळी नीरज गुंडे फडणवीसांचे निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे मांडवली करण्यासाठी जायचा. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाही गुंडे भाजपा आणि शिवसेना सोबत यावी यासाठी प्रयत्न करत होता. गुंडेचा उद्धव ठाकरेंशी काहीही संबंध नाही.'

तसेच 'हे प्रकरण महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग्ज व्यवसायाचं (Drug business) आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक वजीर याच शहरात राहतो. त्याचं नाव निरीज गुंडे असं आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील तोच ठरवायचा. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची.' असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

त्याचबरोबर 'जयदीप राणा (Jatdeep Rana) तुरुंगात बंद आहेत. दिल्लीतील (Delhi) एक प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती. एका सुनावणीवेळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. त्यावेळी NCB ने सांगितले होते, की तो तुरुंगात आहे. मात्र, आता हा साबरमती तुरुंगात बंद असल्याची माहिती मिळते. फडणवीसांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध आहेत'', असंही मलिक म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com