फडणवीसांचा 'बॉम्ब' फुसका, उद्या 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार; मलिकांचा पलटवार

फडणवीसांचा 'बॉम्ब' फुसका, उद्या 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार; मलिकांचा पलटवार

मुंबई | Mumbai

मागील महिन्याभरापासून मुंबईत क्रुझ पार्टीवरील ((cruise drug party case)) एनसीबीच्या (NCB) कारवाईची चर्चा आहे. दिवसागणिक आर्यन खान (Aryan Khan) क्रुझ पार्टी केस मध्ये नवे खुलासे होत असताना भाजपाच्या (BJP) मनोज कंबोजच्या (Manoj Kamboj) मास्टरमाईंडने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी केल्या नंतर आता नवाब मलिकांनाही (Nawab Malik) भाजपाने निशाण्यावर धरलं आहे.

नवाब मलिकांनी कुर्ला (Kurla) मध्ये अंडरवर्ल्डच्या (Underworld) लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा दावा फडणीसांनी केला आहे. मुंबई १९९३ बॉम्बस्फोटमध्ये (Mumbai 1993 bomb blast) संबंधित दोषी आरोपी सरदार शाहवली खान (Sardar Shahwali Khan) आणि सलीम पटेल (Salim Patel) यांच्यासोबत मलिकांनी जमीन व्यवहाराचा सौदा केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान फडणवीसांचे हे आरोप नवाब मलिक यांनी खोडून काढत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पलटवार केला आहे.

नवाब मलिक बोलतांना म्हणाले की, 'आज फडणवीसांनी काही कागदपत्रं लोकांसमोर ठेवली. ज्यात असा उल्लेख आहे की दीड लाख फूट जमीन आम्ही कवडीमोल दराने माफियांच्या मदतीने खरेदी केली. आम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्रं उपलब्ध करुन दिली असती. पण तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाय. आज तर त्याविषयीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार नाही. पण उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.' असं मलिक यांनी म्हटलंय.

तसेच, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या आशीर्वादाने एक अंडरवर्ल्ड डॉन विदेशात बसून वसुली करायचा. त्यात कोण अधिकारी यांच्यासाठी काम करायचा, हे सगळं मी देशासमोर आणणार आहे, असा इशाराच मलिक यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com