तुमची मेहुणी ड्रग्ज रॅकेटमध्ये कशी?; मलिकांचा वानखेंडेंना सवाल

तुमची मेहुणी ड्रग्ज रॅकेटमध्ये कशी?; मलिकांचा वानखेंडेंना सवाल

मुंबई | Mumbai

गेले काही दिवस सुरु असणारे आर्यन खान क्रुज ड्रग्ज प्रकरणा (cruise drug party case) संबंधित अनेक धागेदोरे समोर आले. याप्रकरणी मंत्री नवाब मलिक (nawab malik) आणि एनसीबीचे (ncb) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

दरम्यान नवाब मलिक यांनी आज एक नवं ट्विट (nawab malik twit) करुन पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मलिक यांनी समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? असा थेट सवाल विचारला आहे. समीर वानखेडेंनी या प्रकरणात उत्तर द्यावं, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी म्हंटलं आहे की, 'समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचं सांगितलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत.

दरम्यान, मलिक यांच्या या ट्वीटनंतर वानखेडे यांनी तात्काळ खुलासा केला आहे. 'हर्षदा रेडकर यांच्या विरुद्धच्या प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. ही केस जानेवारी २००८ ची आहे. या प्रकरणानंतर ९ वर्षांनी, म्हणजेच २०१७ साली क्रांती सोबत माझं लग्न झालं. शिवाय, २००८ साली मी एनसीबीच्या सेवेतही नव्हतो. मग त्या प्रकरणाशी माझा संबंध कसा असू शकतो? यात विनाकारण माझं नाव गोवलं जात आहे,' असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com