अनिल देशमुखांना क्लिन चीट?; नवाब मलिक म्हणतात…

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना क्लिन चीट (clean cheat) देण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी थेट सीबीआयला (CBI) सवाल केला आहे.

नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ‘देशामध्ये फेकन्यूज (FakeNews) हे व्हायरस सारखे पसरत असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले आहे. सत्य समोर आणण्याची जनतेची, माध्यमांची आणि जे सत्तेत आहेत त्यांची जबाबदारी आहे. हा अहवाल खरा की खोटा हे सीबीआयसोडून कुणीही सांगू शकत नाही. सीबीआयने याबाबतील खुलासा करायला हवा,’ असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

तसेच ‘हा अहवाल मुद्दाम समोर आणला जात आहे का असा प्रश्न विचारल्यावर नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ही कागदपत्रे सीबीआयच्या रेकॉर्डचा भाग आहे की नाही याचा खुलासा सीबीआय करु शकते. जर खोटं असेल तर याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई होऊ शकते. जर हे खरं असेल तर सीबीआयने हे सांगितलं पाहिजे,’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या एका जुन्या ट्विटचाही संदर्भ दिला आहे. पवार यांनी म्हटलं आहे, ‘सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो.’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

सीबीआयच्या व्हायरल अहवालात काय म्हटलंय

सीबीआयच्या व्हायरल अहवालात म्हटलं आहे की, अनिल देशमुख यांची आत्तपर्यंत चौकशी प्राथमिक चौकशी करण्यात आली, मात्र या प्राथमिक चौकशीदरम्यान त्यांच्याविरोधात एकही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे काहीच तथ्य नसलेली चौकशी बंद करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच चौकशीदरम्यान त्यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील चौकशी थांबवण्यात यावी. तसेच पुढची कारवाई थांबवावी. देशमुख यांच्या निवासस्थानी, वाझे आणि देशमुख यांच्यात कोणतीही बैठक झाल्याचा पुरावा नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *