'ये तुने क्या किया...'; नवाब मलिकांची गौप्यस्फोटांची मालिका सुरूच

'ये तुने क्या किया...'; नवाब मलिकांची गौप्यस्फोटांची मालिका सुरूच

मुंबई | Mumbai

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या (sameer wankhede) कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले.

तसेच समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट करत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवाब मलिक यांनी मध्यरात्री आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन एक फोटो ट्विट केला आहे. नवाब मलिक यांनी फोटो ट्विट करताना कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, 'कबूल है, कबूल है, कबूल है... याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे असं लिहिलं आहे की, 'समीर दाऊद वानखेडे तुम्ही हे काय केलं?'.

नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये टोपी घातलेला एक व्यक्ती (नवाब मलिक यांचा मते ही व्यक्ती समीर वानखेडे आहे.) एका कागदावर सही करताना दिसत आहे. हा 'निकाहनामा' असल्याचे सांगितले जात आहे.

या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली. यामाध्यमातून त्यांनी सरकारी नोकरी मिळवली, असा दावा देखील नवाब मलिकांनी केला आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. तसेच वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नाव मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. तिथे मलिक यांनी आपल्याकडील पुरावे सादर केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com