VIDEO : “नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाही...”; फडणवीसांचा पलटवार

VIDEO : “नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाही...”; फडणवीसांचा पलटवार

मुंबई | Mumbai

विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या इशाऱ्यावर मुंबईत (Mumbai) ड्रग्जचा (Drug) खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. नवाब मलिक यांच्या या आरोपाला आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उत्तर दिलं आहे. मात्र त्यासोबतच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी (underworld) संबंध असल्याचा धक्कादायक आरोपही फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे की, 'नवाब मलिकांनी दिवाळीच्या (DIwali) सुरुवातीला लवंगी फटाका लावत बॉम्ब फोडल्याचा आव आणला आहे. मात्र, मलिकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. आपल्या जावयाची चार्जशीट कमकुवत व्हावी आणि NCB ने दबावात येऊन आपल्या जावयाला सोडावे यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.'

तसेच मंत्री नवाब मलिक यांनी लावलेले आरोप हास्यास्पद आहे. रिव्हर मार्च (River March) या संघटनेने रिव्हर अँथम तयार केले होते. या टीममधील व्यक्तींनी आमच्यासोबत फोटो घेतले होते. चार वर्षांपूर्वीचे हे फोटो होते. त्यावरुन मलिक यांनी आम्हाला माफिया ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या पत्नीसोबतचा फोटो जाणीवपूर्वक ट्विट केला आहे. कारण त्याचे महत्त्व वाढते. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत काय संबंध आहेत. त्याचे पुरावे हे तपास यंत्रणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही देणार आहे, असेही ते म्हणाले.

नीरज गुंडे हे तुमचे सचिन वाझे आहेत? असा आरोप नवाब मलिक यांनी तुमच्यावर केलाय. या प्रश्नावर बोलतान फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात नीरज गुंडे (Niraj Gunde) उत्तर देतील. पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेसंदर्भात आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे. नीरज गुंडे यांच्याशी संबध आहेतच. पण मी जेवढे वेळा नीरज गुंडेच्या घरी गेलो, त्यापेक्षा जास्तवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्या काही कालावधीत गेले आहेत. किंवा मी जेवढेवेळा मातोश्रीवर गेलोय, त्यापेक्षा जास्तवेळा नीरज गुंडे मातोश्रीवर (Matoshree) गेले आहेत. कदाचीत माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबध असावेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या टीकेनंतर भाजपमध्ये (BJP) जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. महाराष्ट्र भाजपतील अनेक नेते फडणवीस यांच्या बचावासाठी उतरले आहेत.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हटले आहे की, 'यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा आणि त्या आधारे ट्विट करून सनसनाटी निर्माण करायची अशाप्रकारची त्यांची कामगिरी गेल्या काही दिवसांपासून दिसतेय.'

तसेच नवाब मलिक यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे मात्र, आपल्या ट्विटमध्ये त्यांनी कोणाचेच नाव घेतले नाही. 'चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते!' असे म्हटले आहे .

Related Stories

No stories found.