मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; नवनीत राणांचे थेट आव्हान

मुख्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; नवनीत राणांचे थेट आव्हान

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा केला होता. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते...

त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

४ मे रोजी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. ५ मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. मानदुखीचा त्रासामुळे तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

खासदार नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच नवनीत राणांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्या म्हणाल्या की, मी पूर्णपणे बरी झालेली नाही, अजून औषधोपचार सुरु आहेत. कारागृहात मिळालेल्या वागणुकीमुळे मला मानसिक त्रास झाला. मात्र यापुढेही माझा लढा सुरूच राहणार आहे. हनुमान चालीसासाठी १४ दिवस काय १४ वर्ष शिक्षा भोगेल, हनुमान चालिसा म्हणणे गुन्हा आहे का? असे सवाल त्यांनी केला आहे.

ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे. आम्ही मविआ सरकारला घाबरत नाही. महापालिका निवडणुकीत जनता ठाकरे सरकारला उत्तर देईल. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून दाखवावी. मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ निवडावा आणि माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी, असे थेट आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे.

Related Stories

No stories found.