Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानागपूरात पोहोचताच राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नागपूरात पोहोचताच राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नागपूर । Nagpur

काही दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) घरासमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला होता….

- Advertisement -

त्यावरून मुंबईत (Mumbai) प्रचंड गोंधळ झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांची जामिनावर सुटका झाली असून ते आज ३६ दिवसांनंतर नागपूरमध्ये (Nagpur) दाखल झाले. यावेळी त्यांनी नागपुरातील हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे…

यावेळी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या की, महाराष्ट्रात राम आणि हनुमानाचा इतका विरोध का आहे? ज्या पद्धतीने दिल्लीत आम्ही हनुमान चालिसाचे पठण केले, रॅली काढली, आरती केली, तिथे काहीही त्रास झाला नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) विरोध का कळत नाही. माझ्या महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे, त्यासाठी आज मी हनुमान चालिसा पठण करत आहे असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

तसेच हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण हा सगळा दिखावा करत असल्याची टीका होत असल्याबाबत विचारणा केली असता नवनीत राणा यांनी त्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आम्ही दिखाव्यासाठी करतो, मुख्यमंत्री दिखाव्यासाठीही करत नाहीत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठी का होईना, हनुमान चालीसा वाचावी” असेही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून म्हटले आहे की, ”ही सगळी नेहमीची प्रक्रिया आहे. आम्ही जिथे जिथे पोहोचतो, तिथे मुख्यमंत्री पूर्ण ताकद लावतात.

आम्हाला परवानगी नाकारणे, ताब्यात घेणे असे प्रकार सुरू आहेत. हा सगळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकार आहे. राज्याची जनता हे पाहात आहे. हनुमानाचे नाव घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये आलेला हा अहंकार मोडून काढण्याचे काम राज्यातील हनुमान भक्त करतील, असेही रवी राणा म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या