राणा दाम्पत्याला जामीन की कोठडी?

राणा दाम्पत्याला जामीन की कोठडी?

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Mumbai) यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केला. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले....

दिवसभराच्या राजकीय नाट्याच्या अंत राणा दाम्पत्याच्या अटकेने झाला होता. त्यांच्यावर पोलिसांनी (Police) कलम १२३ (अ) अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल केला. तसेच चिथावणीखोर वक्तव्य करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणे, असेही गुन्हे राणा दाम्पत्यावर दाखल करण्यात आले आहे.

नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांची रात्र पोलीस ठाण्यातच गेली. आज राणा दाम्पत्याला घेऊन पोलीस सुनावणीसाठी न्यायालयात (Court) घेऊन जात आहेत.

यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सुनावणीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com