Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानवजोतसिंग सिद्धू अखेर तुरुंगाबाहेर येणार

नवजोतसिंग सिद्धू अखेर तुरुंगाबाहेर येणार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

रोड रेज (Road Rage) प्रकरणी पटियाला तुरुंगात कैद असलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू (navjot singh sidhu) १ एप्रिल रोजी तुरुंगाबाहेर येणार असल्याची माहिती मिळत आहे. सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे….

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रोड रेज प्रकरणात (Road Rage Case) सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २० मे रोजी सिद्धू यांनी पटियाला कोर्टात आत्मसमर्पण केले होते. उद्या ते तुरुंगातून मुक्त होणार असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘ती’ चूक जीवावर बेतली! डासांना मारणाऱ्या कॉईलमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

आतापर्यंत सिद्धू यांनी ११ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. या काळात एकदाही त्यांनी पॅरोल सुट्टी घेतली नाही. अंमली पदार्थांची तस्करी करणे किंवा मोठ्या गुन्ह्यांमध्ये कैद असलेले गुन्हेगार वगळता इतर सर्व प्रकारच्या कैद्यांना कारागृहातील वर्तनाच्या आधारावर महिन्यातून चार ते पाच दिवसांची सूट दिली जाते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव

याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही कैद्यांना लाभ मिळतो. परंतु सिद्धू यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. त्यामुळे सिद्धू यांना काही दिवस आधीच तुरुंगातून मुक्त केले जाणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या