नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी आज ED समोर हजर राहणार

नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी आज ED समोर हजर राहणार

दिल्ली | Delhi

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald Case) आज काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

राहुल गांधी आज १०. ३० वाजता राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्याआधीच काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान काँग्रेस आज आपल्या मुख्यालयापासून एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडीच्या मुख्यालयापर्यंत रॅली काढणार असून त्याद्वारे आपली राजकीय ताकद दाखवेल, अशी योजना आहे.

मात्र, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) काँग्रेसच्या रॅलीला परवानगी नाकारलीय. दिल्ली पोलिसांनी रॅलीला परवानगी न देण्यामागं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com