नाथाभाऊ मोठे नेते ; त्यांच्या बद्दल बोलणार नाही

माजी मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर
नाथाभाऊ मोठे नेते ; त्यांच्या बद्दल बोलणार नाही

जळगाव - jalgaon

नाथाभाऊ हे फार मोठे नेत आहेत, त्यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाजपातील नेत्यांवर काही वक्तव्य केले असतील तरी देखिल...

आपण त्यावर काहीही बोलणार नसल्याची भूमिका माजी मंत्री गिरीष महाजन यांनी आज शुक्रवारी जळगावात पत्रकांरांशी मनोगत मांडली. जळगाव महापालिकेचे विविध समस्यांबाबत माजी मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महानगरपालिकेत आयोजीत करण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकांरांशी बोलत होते.

यावेळी पत्रकांरांनी त्यांना एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेवर केलेल्या आरोपांबाबत छेडले असता महाजन म्हणाले कि, आम्हाला पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्यामुळे नाथाभाऊंनी केलेल्या वक्तव्यांबाबत आपण काहीएक बोलणार नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी पक्षश्रेष्ठी आहेत. तेच त्यांना उत्तर देवू शकतील. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील व्यक्तीला माजी मुख्यमंत्री योग्य उत्तर देवू शकतील त्यामुळे या विषयावर देवेन्द्र फडणवीसच योग्य भूमिका मांडू शकतात, असा टोलाही महाजन यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com