Saturday, April 27, 2024
Homeराजकीयनशिराबाद ग्रामपंचायतीतर्फे 82 जणांची माघार

नशिराबाद ग्रामपंचायतीतर्फे 82 जणांची माघार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नामांकन उमेदवारी अर्ज माघार घेण्याची दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीच्या आत काही जणांनी माघार घेतली तर काही उमेदवारांनी गावातील पदाधिकार्‍यांच्या मिनतवार्‍यांना न जुमानता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

- Advertisement -

असे असले तरी मात्र जिल्हयात नशिराबाद ग्रामपंचायतीच्या सर्वच 82 नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येत नामांकन अर्ज माघारी घेतले आहेत.

एकाच वेळी ग्रामपंचायतीच्या सर्वच उमेदवारांनी नामांकन अर्ज माघारी घेण्याची हि पहिलीच घटना जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात घडली आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यात आल्याची घोषणा नगरविकास विभागातर्फे दि. 24 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणूकांचे नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या दरम्यान नशिराबाद ग्रामस्थातर्फे ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याची मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले होते.

परंतु निवडणूक आयोगाकडून कोणतीही सूचना वा निर्देश आलेले नसल्याने जाहिर झाल्याप्रमाणे नशिराबाद ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात होती.

दरम्यान आज दि.4 जानेवारी 2021 रोजी जिल्हयात 783 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी आज माघारीचा दिवस होता. परंतु नशिराबाद ग्रामपंचायत निवडणूक रद्द न झाल्याने सर्वच 82 उमेदवारांनी घोषित झाल्याप्रमाणे नगरपंचायत निवडणूक घेण्यात यावी यासाठी दाखल करण्यात आलेले ग्रामपंचायत नामांकन अर्ज माघार घेतले. हि घटना जिल्हयातच नव्हेतर राज्यात प्रथमच घडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या