पंतप्रधान मोदी, शरद पवार यांची भेट कशासाठी? चंद्रकांत पाटील म्हणाले...

पंतप्रधान मोदी, शरद पवार यांची भेट कशासाठी? चंद्रकांत पाटील म्हणाले...
चंद्रकांत पाटील

नाशिक | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची आज भेट झाली. ही भेट नेमकी कशासाठी झाली याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीक्ती दिली आहे. ते म्हणाले की, ही भेट आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने झाली असावी....

ओबीसी आरक्षण, शेतकरी आंदोलन व नव्या सहकार खात्याच्या दृष्टीकोऩातुन त्यांची चर्चा झाली असण्याची शक्याता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केली.

पाटील आजपासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आले आहेत. सकाळी शहरात आगामन होताच संघ समन्वय शाखा- शंकराचार्य संकुल येथे त्यांनी संघ पदाधिकारी समवेत बैठक घेऊन चर्चा केली.

त्यानंतर भाजपाच्या महानगर पदाधिका़र्‍यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकांरांंनी मोदी - पवार भेटी बाबत विचारले असता त्यांनी वरील माहीती दिली. आगामी महापालिका निवडणुुकीत भाजपा मनसे युतीच्या चर्चे बाबत ते म्हणाले की, जो पयंत मनसे परप्रांतीयांच्या मुद्यावर आपले धोरण बदलत नाही.

तसेच त्यांच्या पक्षाची भुमिका व्यापक होत नाही. तोपर्यंंत त्यांच्याशी राजकीय सुत जुळणे शक्य वाटत नाही. नाशिक दौर्‍याच्या निमित्ताने ते म्हणाले की, प्रत्येक पक्षात मतभेद, नाराजी, थोड्या कुरुबुरी चालुच असतात.

त्याला भाजपाही अपवाद असु शकत नाही. ते मतभेद दुर करणे व मनो मिलन घडवून पक्षात चैतन्य निर्माण करणे गरजेचे असते. म्हणुनच राज ठाकरे, संजय राऊत हे दौैरेे करत आहेत.

आपणही त्याच दृष्टीकोणातुन आलो आहोत. या दौर्‍याच्या निमीत्ताने मतभेद दुर होऊन पदाधिकारी कायकर्ते आणखी जोमााने पक्ष वाढीसाठी कामाला लागतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजच्या दौर्‍यात महानगर अध्यक्ष गिरीश पालवे सरचिटणीस , दहा मंडल अध्यक्ष, मोर्चा, आघाडया व प्रकोष्ठ पदाधिकारी समवेत बैठक बैठक घऊन चर्चा केली. ,सायंकाळी आ. देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, विजय साने, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, महापौर .सतिष कुलकर्णी, सभागृह नेते कमलेश बोडके, अरुण पवार, गणेश गिते, यांच्याशी वैयक्तिक चर्चा करुन जिल्ह्यातील राजकीय स्थीती जाणुन घेतली.

सायंंकाळी माजी आमदार .बाळासाहेब सानप यांंचे निवासस्थानी भेट,दिली. उद्या (दि १८) सकाळी महापौर .सतिष कुलकर्णी,यांचे निवासस्थानी भेट देणार आहेत. पदाधिका़र्‍याबरोबर एकत्रित बैठक घेऊन ते रवाना हेणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com