नाशिक मनपा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ; 'या' दिवशी प्रसिद्ध होणार यादी

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणूक संदर्भातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आता ९ जुलै ऐवजी १६ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे....

राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भातील मतदार यादी तयार करण्याच्या सुधारीत कार्यक्रमानुसार १४ महानगरपालिकांची अंतिम मतदार यादी दि. ९ जुलै, २०१२ रोजी प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु या महानगरपालिकांकडे प्राप्त झालेल्या हरकतींची संख्या मोठया प्रमाणात असल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे असे आयोगाच्या निर्दशनास आले आहे.

त्यामुळे १४ महानगरपालिकांपैकी बृहन्मुंबई, वसई विरार, ठाणे, उल्हासनगर, नदी मुंबई व कल्याण डोबिवली या महानगरपालिका मुंबई महानगर विकास प्राधिकरण या क्षेत्रामधील आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस असून भारतीय हवामान खात्याने पुढील ४ दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

त्यामुळे या कालावधीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे जिकीरीचे आहे. त्यामुळे १४ महानगरपालिकांकरीता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दि. ९ जुलै, २०२२ ऐवजी १६ जुलै २०२२ असा सुधारीत करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com