Video : हॅलो! मी जयंत पाटील बोलतोय तुम्ही राष्ट्रवादीचे बुथ सदस्य आहात...

Video : हॅलो! मी जयंत पाटील बोलतोय तुम्ही राष्ट्रवादीचे बुथ सदस्य आहात...

नाशिक / दिंडोरी | Nashik Dindori

हॅलो मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बोलतोय... तुम्ही राष्ट्रवादीच्या बुथवर सदस्य (NCP booth Member) म्हणून काम करता का... असा थेट फोन करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ग्रामीण भागातील बुथ सदस्याला करत धक्का दिला. पक्षासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता किती महत्त्वाचा आहे हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिले....

दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ज्या कार्यकर्त्याला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कॉल केला त्या कार्यकर्त्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थेट बोलले याचा आनंद ऐकण्यासारखा होता.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा (NCP Parivar Samvad Yatra) नाशिक जिल्हयात असून दिंडोरी मतदारसंघाचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आढावा घेतला.

यावेळी त्यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या बुथ कमिट्यांचा (Review of Booth Comity) आढावा ते घेतात. शिवाय ज्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत ते कार्यकर्ते कशापध्दतीने काम करतायत... कोणत्या अडचणी आहेत याची माहितीही घेतात.

दिंडोरी तालुक्यातील मुळानी (Mulani) गावातील आदेश बबनराव आव्हाड (Babanrao Avhad) या बुथ सदस्याशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोनवरून संवाद साधला आणि पक्षाबाबत इतर माहितीही घेतली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थेट सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत संवाद साधत असल्याने त्यांच्या या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.