Video : मुंडे भगिनी नाराज नाहीत, काय म्हणाले फडणवीस नाशकात?

Video : मुंडे भगिनी नाराज नाहीत, काय म्हणाले फडणवीस नाशकात?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर (Cabinate Expansion) मुंडे भगिनी नाराज झाल्या आहेत अशी सर्वत्र चर्चा आहे. नाशकातही अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अखेर मौन सोडले आहे. कोणाला मंत्रिपद द्यायचे कोणाला नाही, याचा संपूर्ण निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो. मुंडे भगिनी नाराज नसून त्यांना बदनाम करू नका असेही सांगितले आहे....

नाशिक महापालिकेच्या बससेवेचे उद्घाटन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणीस आज नाशिक दौऱ्यावर होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले, नारायण राणे (Narayan Rane) हे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रीमंडळात गेले आहेत असे ते म्हणाले. दुसरीकडे, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना कालच इडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. त्यावर खडसेंनी राजकीय हेतूने ही कारवाई होत असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, यावर बोलताना ते म्हणाले की, मी ईडीचा प्रवक्ता नाही खडसे प्रकरणात मी काय बोलणार मी काय ईडीचा प्रवक्ता नाही. पुरावे असतील म्हणूनच इडी चौकशी करत असेल.

डॉ भारती पवार यांचे तोंड भरून कौतुक

नाशिकला ५० वर्षानंतर केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. डॉ. पवार यापुढे चांगले काम करून आपली छाप उमटवतील असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com