गिरिश पालवे यांची भाजप शहराध्यक्षपदी फेरनिवड

गिरिश पालवे यांची भाजप शहराध्यक्षपदी फेरनिवड
BJP

नाशिक । प्रतिनिधी

भाजपची जॅम्बो महानगर कार्यकारणी जाहीर झाली असून गिरिश पालवे यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवत त्यांची शहराध्यक्ष पदी फेरनिवड केली आहे. या नूतन कार्यकारिणीमध्ये दहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, दहा चिटणीस, एक कोषाध्यक्ष, युवा मोर्चा, महिला आघाडीसह विविध आघाडी आणि सेलचे अध्यक्ष, सदस्य आणि कायम निमंत्रितांचा यात समावेश असून, अनेक नव्या चेहऱ्यांना त्यात संधी दिली....

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या प्रमाणात भाजपचे संघटनात्मक विस्तारीकरण करण्यासाठी पदाधिकारी संख्येत वाढ करण्याची आवश्‍यकता असल्याने प्रदेशाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले.

उपाध्यक्षपदी रामहरी संभेराव, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ लोणारी, सचिन ठाकरे, प्रकाश घुगे, कुणाल वाघ, यशवंत निकुळे, अलका जांभेकर, प्रा. वर्षा भालेराव, नीलेश बोरा यांची वर्णी लागली अाहे.

संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगूरकर, जगन पाटील यांची निवड केली आहे. चिटणीसपदी राजेश आढाव, छाया देवांग, स्वाती भामरे, माधुरी बोलकर, सुजाता जोशी, हर्षा फिरोदिया, अजिंक्य साने, ॲड. श्‍याम बडोदे, अमित घुगे, संतोष नेरे यांची नियुक्ती झाली आहे तर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी आशिष नहार यांच्यावर सोपवली आहे.

युवा मोर्चा अध्यक्षपदी मनीष सुनील बागूल, महिला आघाडी मोर्चा हिमगौरी आडके-आहेर, अनु.जाती मोर्चा शशांक हिरे, किसान मोर्चा हेमंत पिंगळे, अनुसूचित जमाती मोर्चा प्रा. परशराम वाघेरे, अल्पसंख्याक मोर्चा फिरोज शेख तर ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी चंद्रकांत थोरात यांची निवड कण्यात आली आहे. याशिवाय 19 विविध आघाड्यांच्या पादाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यातत आली आहे.

कायम निमंत्रित सदस्य

कायम निमंत्रित सदस्यांमध्ये आ. प्रा. देवयानी फरांदे, खा. डॉ. भारती पवार, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागूल, सतीश कुलकर्णी, आ. सीमा हिरे, आ.ॲड. राहुल ढ़िकले, आ.डॉ. राहुल आहेर, प्रा. सुहास फरांदे, विजय साने, भिकूबाई बागूल, प्रदीप प्रेशकार आणि रोहिणी नायडू यांचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com