Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआगामी महापालिका निवडणूक तीन विरुद्ध एक; सत्ता पुन्हा भाजपचीच

आगामी महापालिका निवडणूक तीन विरुद्ध एक; सत्ता पुन्हा भाजपचीच

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापालिका निवडणूक (Nashik Municipal Corporation Election) अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. आगामी निवडणूक ही तीन विरुद्ध एक अशीच होणार आहे. त्यामुळे महानगर पालिकेत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. विकासाचा क्रम चालू ठेवायचा असेल तर परत निवडून देणं गरजेचं आहे. नाशिककर पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने आपला कौल देतील. त्यामुळे आगामी महापालिकेत भाजपचाच झेंडा डौलाने फडकणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra Chief Chandrakant Patil) म्हणाले….

- Advertisement -

आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil leader bjp), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danave Patil), आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार ( Health and Family welfare minister of state Dr bharati pawar) , माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्या उपस्थित सातपूरमध्ये एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पाटील संबोधित करत होते.

ते म्हणाले, जनतेने मोदींना दुसऱ्यांदा निवडून दिल्यानेच विकास होत आहे. राज्यात सरकार बदललं याचा नागरिकांना पश्चाताप झाला आहे. महाराष्टाचा विकास थांबला आहे. ड्रग्जमुळे पिढी बरबाद होत आहे.

राज्य सरकारमधील काही मंत्री जेलमध्ये आहेत काहीची नावे अजून यायची आहेत असेही पाटील म्हणाले. सारखे-सारखे केंद्रावर आरोप करणे चुकीचे आहे. त्रिपुरा दंगलीचे पडसाद मालेगाव, नांदेडमध्ये पडले.

याअगोदर कधी कुणाची हिम्मत झाली नाही दंगल करण्याची. राज्यात कोणीही पोलिसांना घाबरत नाही. सरकारचा दबदबा राहिला नसल्याचेही पाटील यांनी सांगत महाविकास आघाडीवर टीका केली.

2014 पर्यंत शेतकरी विमा भरत नव्हता. मोदींचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळू लागले. (Crop Insurance) अतिवृष्टी झाली मात्र अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. यामुळे नागरिक तुलना करू लागले आहेत. माणसाचे हावभाव बघून माणसाची ओळख होते. येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत तीन जणांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे विकास होण्यासाठी

महानगर पालिके एक हाती सत्ता असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नगरसेवकांच्या सभेला एवढी मोठी गर्दी पहिल्यांदा पहिली. ही सभा काही इतर कारणासाठी असावी असली पाहिजे.

100 वर्षांत मोठं संकट आलेले आहे असे म्हणतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटावरदेखील मात केली आहे.

रावसाहेब दानवे, केंद्रींय मंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या