'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'

'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'

अहमदनगर | Ahmednagar

नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेत आपले पुत्र सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी मार्ग मोकळा केला होता. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पण सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी पत्ते उघड करत ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.

त्यामुळे सत्यजीत यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी काँग्रेस पक्षावर रिंगणात उमेदवार नसण्याची नामुष्की ओढवली आहे. हा दगाफटका काँग्रेसच्या जिव्हारी लागला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आक्रमक झाले आहेत. एवढेच नव्हेतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या सुधीर तांबे आणि त्यांच्या मुलावर शिस्तभंगाची कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'
Vidhan Parishad Election 2023 : पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?; माजी गृहमंत्र्यांनी भाजपला डिवचलं

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबद्दल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एक मोठं विधान केलं होतं. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजीत तांबे यांना किती दिवस बाहेर ठेवणार, अशा चांगल्या लोकांवर आमचा डोळा असतो. असं म्हंटलं होतं.

आणि त्याचवेळी सत्यजीत तांबे यांना आमदार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आणि त्याचनंतर फडणवीस सत्यजीत तांबे यांची स्क्रिप्ट लिहिल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात किती पक्षी मारले आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.

'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'
Vidhan Parishad Election 2023 : सत्यजीत तांबेंचा मार्ग खडतर? नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले...

त्याच दरम्यान थोरात-तांबे यांच्या घरात कलह सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून दुसरींकडे काँग्रेसला फडणवीस यांनी धक्का दिला आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांनाही चेकमेट दिल्याची बोललं जात आहे. सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आहेत, त्यांच्याच भाचाला तिकीट देण्याची रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी आखली होती.

तर दुसरींकडे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात असतांना त्यांनाही एकप्रकारे चेकमेट देऊन फडणवीस यांनी तांबे यांना पाठबळ दिले आहे. तर तिसरीकडे बाळासाहेब थोरात हे रुग्णालयात असतांना सत्यजीत तांबे यांना आमदार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमध्ये ऑपरेशन केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'
'डेथ मिस्ट्री' : MIDC हद्दीत आठ दिवसात दुसऱ्यांदा आढळला कुजलेला मृतदेह
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com