नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; काल ठाकरे गटाचा पाठिंबा अन् आज शुभांगी पाटील नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; काल ठाकरे गटाचा पाठिंबा अन् आज शुभांगी पाटील नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत एक महत्त्वाची माहिती समोर येते आहे. अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील या आता नॉट रिचेबल आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. निवडणुकीतून माघार घेतात का सरळ लढत देता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन काँग्रेस आणि महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर महाविकास आघाडीने नवे डावपेच रचण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर आल्या होत्या. याठिकाणी झालेल्या बैठकीनंतर ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.

नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; काल ठाकरे गटाचा पाठिंबा अन् आज शुभांगी पाटील नॉट रिचेबल, चर्चांना उधाण
“राजा का बेटा राजा नही बनेगा” म्हणत, सत्यजीत तांबेंच टेन्शन वाढवणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण?

त्यामुळे सत्यजीत तांबे यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांच्या पाठिशी ताकद उभी करेल, अशी चर्चा होती. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान आज माघारीचा दिवस असून आतापर्यंत चार उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर आले आहे. यात डॉ सुधीर सुरेश तांबे (Sudhir Tambe) यांची निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे, हिंदुस्थान जनता पार्टीचे दादासाहेब हिरामण पवार आणि धनंजय जाधव यांनी देखील माघार घेतली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक रिंगणात १८ उमेदवार आहेत. मात्र अद्याप माघारीचा दिवस शिल्लक असल्याने आणखी काय चित्र पालटते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; काल ठाकरे गटाचा पाठिंबा अन् आज शुभांगी पाटील नॉट रिचेबल, चर्चांना उधाण
“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत

दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency Election) काँग्रेसकडून (Congress) डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पंरतु,अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. तांबेंनी माघार घेत त्यांच्याऐवजी पुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर कॉंग्रेस हायकमांडने याप्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; काल ठाकरे गटाचा पाठिंबा अन् आज शुभांगी पाटील नॉट रिचेबल, चर्चांना उधाण
पदवीधर निवडणूक : शिर्डी विमानतळावर फडणवीस आणि विखेंमध्ये गुप्त चर्चा; सत्यजीत ताबेंबद्दल खलबतं?

पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काँग्रेसने डॉ. सुधीर तांबेंवरील निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करत ही माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com