अटलजींचा विक्रम नरेंद्र मोदींनी मोडला

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली | New Delhi –

नरेंद्र मोदींनी Narendra Modi भाजपचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee यांचा विक्रम देखील त्यांनी मोडीत काढला आहे. तसेच, पंतप्रधान पदावर सर्वात जास्त काळापर्यंत असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी हे सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. ते सलग 2 हजार 256 दिवस या पदावर होते. 19 मार्च 1998 रोजी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि सलग 22 मे 2004 पर्यंत त्या पदावर राहिले. त्यांचा पहिला कार्यकाळ 19 मार्च 1998 ते 13 ऑक्टोबर 1999 पर्यंत होता, तर दुसरा कार्यकाळ 13 ऑक्टोबर ते 22 मे 2004 पर्यंत होता.

सद्य:स्थितीत पंतप्रधानपदावर आरूढ असलेले नरेंद्र मोदी हे 2 हजार 260 दिवसांपासून आजतागायत पंतप्रधानपदावर कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ 26 मे 2014 पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. 2014 मध्ये भाजपा स्पष्ट बहुमत मिळवत देशात सत्तेत आली होती. त्यानंतर 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांचा पहिला कार्यकाळ 2019 मध्ये संपला होता. मात्र, पुन्हा एकदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा जबरदस्त यश मिळवत सत्ता प्राप्त केली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान झाले.

स्वातंत्र्यानंतर 1947 पासून ते 2020 पर्यंत देशाला 15 पंतप्रधान मिळाले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम आहे. ते 6 हजार 130 दिवस या पदावर होते.

जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी 5 हजार 829 दिवस पंतप्रधानपदावर होत्या. 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 म्हणजेच 11 वर्षे 59 दिवस त्या सलग पंतप्रधान पदावर होत्या. त्यानंतर दुसर्‍यांदा 14 जानेवारी 1980 पासून ते 31 ऑक्टोबर 1984 पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले.

इंदिरा गांधी यांच्यानंतर डॉ. मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधानपदावर होते. ते संपुआ-1 व संपुआ-2 सरकारमध्ये 2004 ते 2014 पर्यंत म्हणजेच सलग 10 वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर 3 हजार 656 दिवस पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *