आता गप्प बसणार नाही; नारायण राणे कडाडले

पवारांना सुसंस्कृतपणावरुन विचारला प्रश्न
आता गप्प बसणार नाही; नारायण राणे कडाडले

मुंबई | Mumbai

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान (Jan Ashirvad Yatra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) अडचणीत सापडले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक ठिकाणी एफआयआर (FIR) दाखल झाल्या व अखेर संध्याकाळी महाड पोलिसांनी (Mahad Police) राणे यांना अटक केली. रात्री उशिरा महाडच्या स्पेशल कोर्टात (special court) राणे यांच्या जामिनाबाबत सुनावणी पार पडली व अखेर त्यांना जामीन मंजूर झाला. एखाद्या केंद्रीय मंत्र्याला पदावर असताना अटक होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. या घटनेनंतर नारायण राणे (Narayan Rane) यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.

ज्यांना देशाचा स्वातंत्र्यदिनाविषयी (Independence Day) माहिती नाही, त्यांनी चेष्टा करावी हे सहन न झाल्यानेच माझ्या तोंडून ते वाक्य आले असे म्हणत नारायण राणेंनी स्वतःच्या विधानाचे समर्थन केले. तसेच शिवसेनेवर (Shivsena) शरसंधान साधताना तुम्ही कुणीही माझं काहीही करू शकत नाही. तुम्हा सर्वांना मी पुरून उरलो आहे. शिवसेना वाढली त्यात माझाही वाटा आहे. तेव्हा यापैकी कुणी नव्हते. ज्यांनी अपशब्द वापरले तेही तेव्हा नव्हते असेही राणे म्हणाले.

पवारांना सुसंस्कृतपणावरुन विचारला प्रश्न

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या काही जुन्या वक्तव्यांची माहिती देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरच निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर बोलताना वापरलेला 'निर्लज्ज' हा शब्द आणि नुकतंच एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना झापड मारण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा याचा संदर्भ देत राणे यांनी शरद पवारांनाच प्रश्न विचारला. राणे म्हणाले की, 'काय पवारसाहेब...काय सज्जनपणा आहे...काय स्वज्वळपण आहे....एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं, त्यामुळे त्यांनी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही...काय भाषा आहे?' असा सवाल नारायण राणे यांनी शरद पवारांना विचारला.

अनिल परबांना नारायण राणेंचा थेट इशारा

दिशा सालियान प्रकरणात (Disha Salian case) नाव आलेल्या त्या मंत्र्याला आणि अनिल परब (Minister Anil Parab) यांना नारायण राणे यांनी थेट इशारा दिलाय. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं सूचक वक्तव्य राणेंनी केलं आहे. अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणातही चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असंही राणेंनी म्हटलंय. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर (Shiv Sena vs Narayan Rane) हल्ला चढवलाय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com