केंद्र सरकारकडून नारायण राणेंना 'Y' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, नारायण राणेंसह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता
नारायण राणे
नारायण राणे

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, नारायण राणेंसह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान, नारायणे राणे केंद्र सरकारने त्यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

नारायण राणे यांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या Y सुरक्षतेत 12 सीआयएसएफचे जवान असणार आहेत. तर राज्य सरकारने नारायण राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेण्यात आल्याने अधिक चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्र सरकारनं भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता थेट केंद्राकडून सुरक्षा दिली गेली आहे. येत्या काळात भाजपच्या इतरही नेत्यांना सुरक्षा देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

काय आहे Y दर्जाची सुरक्षा ?

या Y दर्जाच्या सुरक्षेमध्ये एकूण 11 कर्मचारी असतात. ज्यात 1 किंवा 2 कमांडो आणि बाकी पोलीस कर्मचारी संबधित व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात. यामध्ये 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर सुद्धा असतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com