“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी....”; नारायण राणेंचे सूचक ट्वीट

“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी....”; नारायण राणेंचे सूचक ट्वीट

मुंबई । Mumbai

शिवसेनेचे (Shivsena) खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

नाराज आमदार गुजरातच्या (Gujrat) सूरतमध्ये (Surat) असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गुजरात भाजपाच्या काही नेत्यांसोबत संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यात वेगळी समीकरणं जुळू पाहाताहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

याचा दरम्यान भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक ट्विट केलं आहे. नारायण राणे यांनी म्हंटल आहे की, 'शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.' नारायण राणेंच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आलं आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com