
मुंबई | Mumbai
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली सपत्नीक राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. नारायण राणे असं अचानक राज ठाकरेंच्या भेटीला गेल्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट घेतली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झालीय. राणे आणि राज ठाकरेंची ही सदिच्छा भेट असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. भाजपाने आपलं सर्व लक्ष आता मुंबई महापालिकेवर केंद्रीत केलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. सोबतच मनसे देखील युतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज नारायण राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.