नारायण राणेच पांढर्‍या पायाचे मंत्री

मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टिकेला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांचा पलटवार
नारायण राणेच पांढर्‍या पायाचे मंत्री

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोकणातील नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाले आणि कोकणावर अतिवृष्टीसह महापूराचे संकट आले. त्यामुळे खर्‍या अर्थाने नारायण राणेच हे पांढर्‍या पायाचे मंत्री असल्याची टीका जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत ते होते.

रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक संकट महाराष्ट्रावरच येत आहे. त्यामुळे ठाकरे हे पांढर्‍या पायाचे असल्याचा आरोप राणेंनी केला होता.

त्यावर प्रत्युत्तर देतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, नारायण राणे हे कोकणातील असून ते नुकतेच केंद्रात मंत्री झाले आहे. ते मंत्री झाले आणि इकडे कोकणावर संकट आले.

त्यामुहे राणे हेच खर्‍या अर्थाने पांढर्‍या पयाचे मंत्री आहे असे म्हणत त्यांनी राणेंवर टिकास्त्र सोडले. तसेच राज्य संकटात असतांना ही राजकारण करण्याची वेळ नाही.

आता राज्य संकटात आहेत. तो कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा तो व्यक्ती आहे. माणसाने माणसाला मदत करावी, हाच धर्म असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com