अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयांना आले यात्रेचे स्वरुप

नंदुरबार तालुक्यात गटासाठी 48, शहादा तालुक्यात 43 तर अक्कलकुवा तालुक्यात 34 उमेदवारी अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयांना आले यात्रेचे स्वरुप

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या 11 गट व 14 गणांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी मोठया प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील पाच गटांसाठी एकुण 48 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर पंचायत समितीच्या पाच गणांसाठी एकुण 34 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

कोळदे गट

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोळदे गटात रीना रविंद्रसिंग गिरासे यांनी शिवसेनेतर्फे दोन व एक अपक्ष, आशा समीर पवार यांनी शिवसेना व अपक्ष, जीजीबाई रविंद्र पाडवी यांनी शिवसेनेतर्फे दोन, सोमीबाई फत्तू वळवी कविता महेंद्र पाटील यांनी भाजपा व अपक्ष अशा एकुण पाच उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले.

खोंडामळी गट

खोंडामळी गटात आज सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले. यात शांताराम साहेबराव पाटील यांनी भाजपा व अपक्ष, शोभा शांताराम पाटील यांनी भाजपा व अपक्ष, पंकज संभाजी सोनवणे यांनी अपक्ष, गजानन भिका पाटील यांनी शिवसेना, सुनंदाबाई धनराज पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, दिनेश विक्रम पाटील यांनी शिवसेना व अपक्ष, दीपक दशरथ पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोपर्ली गट

कोपर्ली जि.प.गटात आज सहा उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. पंकज प्रकाश गावित यांनी भाजपा व अपक्ष, संभाजी शांतीलाल सोनवणे यांनी काँग्रेस, दीपक दशरथ पाटील यांनी भाजपा व अपक्ष, राहूल श्रीराम कुवर यांनी अपक्ष, मनोज रविंद्र राजपूत यांनी भाजपा, ज्ञानेश्वर रोहिदास पाटील यांनी भाजपा व अपक्ष असे उमेदवारी अर्जं दाखल केले.

रनाळा जि.प.गट

रनाळे जि.प.गटात आज अखेरच्या दिवशी सात उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. शकुंतला सुरेश शिंत्रे यांनी शिवसेनेतर्फे दोन, कल्पना शांतीलाल पाटील यांनी काँग्रेस, रीना पांडुरंग पाटील यांनी भाजपा, प्राजक्ता मनोज राजपूत यांनी भाजपा, दिव्यानी दिपक पाटील यांनी अपक्ष, रुपाली प्रमोद पाटील यांनी अपक्ष, सुशिला पंडीत पाटील यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.

मांडळ जि.प.गट

मांडळ जि.प. गटात आज सात उमेदवारांनी 11 उमेदवारी अर्ज दाखल केले. जागृती सचिन मोरे यांनी शिवसेनेतर्फे दोन, विमल लाला भिल यांनी काँग्रेस, स्मिता मधुकर पाटील यांनी राष्ट्रवादी, शोभा लोटन पाटील यांनी राष्ट्रवादी, रेखा सागर धामणे, यांनी भाजपा, रेखा सागर तांबोळी यांनी अपक्ष, भाग्यश्री जगदीश पाटील यांनी शिवसेना व अपक्ष, चंद्रकला सुधाकर धामणे यांनी भाजपा व अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, कोपर्ली गटात अ‍ॅड.राम रघुवंशी यांनी यापुर्वीच शिवसेनेतर्फे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर कोळदे व खापर गटातून भाजपातर्फे डॉ.सुप्रिया गावित यांनी दि. 3 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

गुजरभवाली गण

गुजरभवाली पं.स.गणात पाच उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. बाबडीबाई कांतीलाल ठाकरे यांनी शिवसेना व काँग्रेस, मधुमती मोहन वळवी यांनी भाजपा व अपक्ष, पल्लवी विश्वनाथ वळवी यांनी काँग्रेस, शितल धमेंद्रसिंग परदेशी यांनी शिवसेना व काँग्रेस, पुष्पांजली मुकेश गावित यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले.

पातोंडा गण

पातोंडा पंचायत समती गणात पाच उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. लताबेन केशव पाटील यांनी भाजपा, दीपमाला अविनाश भिल यांनी शिवसेना व काँग्रेस, यमुबाई गुलाब नाईक यांनी राष्ट्रवादी, प्रमिला प्रभाकर पाटील यांनी भाजपा, वंदना संजय पटेल यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली.

होळतर्फे हवेली गण

होळतर्फे हवेली गणात चार उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. सरुबाई गिरधर मराठे यांनी भाजपा, स्वाती दीपक मराठे यांनी काँग्रेस व शिवसेना, सिमा जगन्नाथ मराठे यांनी भाजपा, नंदाबाई पावबा मराठे यांनी भाजपा व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.

नांदर्खे गण

नांदर्खे पं.स.गणात तीन उमेदवारांनी पाच उमेदवारी अर्ज दाखल केले. सुनिल धरम वळवी यांनी भाजपा व अपक्ष, प्रल्हाद चेतन राठोड यांनी शिवसेना व काँग्रेस, जगन चंदु कोकणी यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले.

गुजरजांभोली गण

गुजरजांभोली पं.स.गणात सहा उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले. सुनिता गोरख नाईक यांनी भाजपा व अपक्ष, तेजमल रमेश पवार यांनी काँग्रेस व शिवसेना, भावेशकुमार काळूसिंग पवार यांनी भाजपा, रंजना राजेश नाईक यांनी काँग्रेस, युवराम किसन माळी यांनी भाजपा, सुरेश जयसिंग नाईक यांनी भाजपा व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

शहादा

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज अखेरच्या दिवशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी 30 तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 43 व्यक्तींनी नामांकन अर्ज दाखल केले. म्हसावद गटातून सर्वाधिक 12 तर सुलतानपूर गणातून 9 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. लोणखेडा गटात केवळ दोनच नामांकन दाखल झाल्याने सरळ लढत होणार असल्याची चिन्हे आहेत.

न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्दबादल ठरवल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. त्यानुसार येथील तहसील कार्यालयात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी इच्छुक उमेदवारांनी प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

गटनिहाय दाखल अर्ज (कंसात पक्ष) -

म्हसावद गट

शशिकांत गोविंद पाटील (भाजप), तुषार छोटूगिर गोसावी (अपक्ष), सचिन मोतीलाल पाटील (अपक्ष), भगवान खुशाल पाटील (अपक्ष) महेश जामसिंग पावरा (भारतीय ट्रायबल पार्टी), सिताराम नूरला पावरा (राष्ट्रवादी), हेमलता अरुण शितोळे (काँग्रेस), सुभाष पुरुषोत्तम पाटील (अपक्ष), सांबरसिंग अब्दुल पावरा (अपक्ष), अब्दुल जब्बार शेख आजाद (शिवसेना), अंबालाल अशोक पाटील (अपक्ष), मुरलीधर छोटू वळवी.

लोणखेडा गट

जयश्री दीपक पाटील (भाजप), गणेश रघुनाथ पाटील (काँग्रेस), पाडळदा बु. - सुनिता धनराज पाटील, धनराज काशिनाथ पाटील (भाजप), हेमराज शशिकांत पाटील (अपक्ष), कमला उर्फ सपना मोहनसिंग शेवाळे (अपक्ष), शितल मोहन शेवाळे (राष्ट्रवादी), मोहनसिंग पवनसिंग शेवाळे, ईश्वर मदन पाटील (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), लक्ष्मण भटू पवार (शिवसेना).

कहाटूळ गट

रोशनी ईश्वर माळी (अपक्ष), ऐश्वर्यादेवी जयपालसिंग राऊळ (भाजप), मंदा रामराव बोरसे, शालिनीबाई भटू सनेर (काँग्रेस), किरण विजय पाटील (अपक्ष), प्रमिला राजेंद्र वाघ (राष्ट्रवादी), हेमलता अरुण शितोळे (अपक्ष), प्रतिमा न्हानू माळी (शिवसेना).

पंचायत समितीच्या गणातील नामांकन अर्ज (कंसात पक्ष)

सुलतानपूर गण

वैशाली पाटील (काँग्रेस), जयवंताबाई पवार (अपक्ष), ताई खेडकर (भाजप), गौरी खर्डे (अपक्ष), आरती पराडके (अपक्ष), जयवंता शेमळे (राष्ट्रवादी), रुख्मा पवार (अपक्ष), मुन्नी पवार (अपक्ष).

खेडदिगर गण

विद्या चौधरी (भाजप), संगीता पाटील (काँग्रेस), सविता पवार (अपक्ष), प्रमिला चव्हाण (राष्ट्रवादी).

मंदाणे गण

रोहिणी पवार (काँग्रेस), चंदनबाई पवार, हेमांगी पाटील (भाजप), कुसुमबाई जाधव (अपक्ष), पतीबाई वाघ (राष्ट्रवादी).

डोंगरगाव गण

धनराज पाटील (काँग्रेस), श्रीराम याईस (भाजप), ताई मोरे, विलास निकुंभ, देवेंद्रसिंग गिरासे (राष्ट्रवादी).

मोहिदे त.ह. गण

कल्पना पाटील (भाजप), शांता पाटील (काँग्रेस), ललिता ठाकरे (राष्ट्रवादी).

जावदे त.बो. गण

रवींद्र पाटील (भाजप), निमा पटले (काँग्रेस), किरसिंग वसावे (अपक्ष), भायसिंग पावरा (अपक्ष), वसंत पाडवी (राष्ट्रवादी), शैलेश पाडवी, गणेश गिरासे (शिवसेना).

पाडळदे बु. गण

दिनेश पाटील (काँग्रेस), दंगल सोनवणे (भाजप), सुदाम पाटील (राष्ट्रवादी).

शेल्टी गण

विलास मोरे (काँग्रेस), उमाकांत पाटील, आनंदा कोळी (राष्ट्रवादी), देविदास भिल, किशोर पाटील (भाजप), रविंद्र शिंदे (अपक्ष) आदींनी नामांकन अर्ज दाखल केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com