Saturday, April 27, 2024
Homeराजकीयमराठा नेत्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही

मराठा नेत्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

प्रत्येक सरकारने मराठा समाजाचा फक्त वापर केला. मराठा समाजाच्या कल्याणासाठी व आरक्षणासाठी कुणी काहीही केले नाहीत.

- Advertisement -

मराठा समाजातील 42 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी त्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये व वारसाला सरकारी नोकरी देण्याचा आदेश शाससाने पारित केला होता. मात्र त्यालाही केराची टोपली दाखविण्यात आली.

प्रत्येक सरकारमध्ये अनेक मराठा मंत्री असतात. व अनेक मराठा आमदार, खासदार असुन फक्त घोषणाबाजी करुन मराठ्यांना मराठा नेत्यांनी फसविण्याचे काम केले. अशा नेत्यांना निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. असा गर्भित इशारा, छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला आहे

श्रीरामपूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, कार्यध्यक्ष देवेंद्र लांबे, सुभाष जंगले, अतुल जुबंड, निलेश बनकर, शैलेश वाघ, विजयकुमार बडाख, सुरेश कुंजीर आदिसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी वार्तालाभ करताना जावळे म्हणाले, प्रत्येक सरकारने मराठा समाजाचा फक्त वापर केला.

मराठा समाजाच्या कल्याणासाठी व आरक्षणासाठी कुणी काहिही केले नाहीत. मराठा समाजातील 42 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी त्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये व वारसाला सरकारी नोकरी देण्याचा आदेश शाससाने पारित केला होता. मात्र त्यालाही केराची टोपली दाखविण्यात आली. प्रत्येक सरकारमध्ये अनेक मराठा मंत्री असतात. व अनेक मराठा आमदार, खासदार असुन फक्त घोषणाबाजी करुन मराठ्यांना मराठा नेत्यांनी फसविण्याचे काम केले.

अशा नेत्यांना निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. छावा संघटना कोणताही राजकीय पक्ष काढणार नसुन फक्त सर्वसामान्यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीन, ज्यांना संताची भाषा समजते. त्यांना त्या भाषेत. त्यांना क्रांतीची भाषा समजते. त्यांन क्रांतीच्या भाषेत उत्तर देऊ.सर्वच नेत्यांनी जाती जातीत वाद निर्माण करून राजकीय फायदा घेतला, असे सांगून अट्रोसिटीचा कायदा रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या