Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीकडून काँग्रेसला संपविण्याचा घाट; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीकडून काँग्रेसला संपविण्याचा घाट; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

नागपूर | Nagpur

गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) काँग्रेसला (Congress) संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करत आहे. याबाबत तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे…

- Advertisement -

गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने (NCP) केलेले अनेक कुरघोडीचे उदाहरणे आम्ही हायकमांड समोर चिंतन शिबिरात मांडली आहे. हायकमांडने हे सर्व ऐकून घेतले असून याबाबत आता पुढील रणनीती ठरवली जाईल, असेही ते म्हणाले.

सध्या देशाची स्थिती श्रीलंकेसारखी झाली आहे. भाजपने धर्म आणि जातीचे राजकारण केले आहे. २ ऑक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काँग्रेस ऐकला चलो रे वर ठाम आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या