काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील शिवसेनेच्या( Shivsena ) नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा ( Mahavikas Aaghadi ) निम्मा कार्यकाल पूर्ण होत असताना आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँँग्रेस ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray )यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole )यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. करोना (Corona )संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने २०१९ साली तीन पक्ष एकत्र आले. काँँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi )यांच्या सुचनेनुसार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालेल असे ठरले आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे.

सोनिया गांधी यांनी दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठीच्या योजनांवर सरकारने काम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना याआधीही पत्र पाठवले होते. कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अडचणी होत्या. पण या कठीण प्रसंगीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारने चांगले काम केले. आता सर्व व्यवहार सुरुळीत सुरु असून अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली आहे. त्यामुळे आता किमान समान कार्यक्रम तसेच दलित, ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबाजवाणी (Implementation of welfare schemes for minorities )करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही. आमदार नाराजीच्या बातमीत तथ्य नाही आघाडी सरकारमध्ये असे प्रकार होत असतात त्यात नवे काही नाही. शिवसेना आणि भाजपचे सरकार असताना सर्व काही आलबेल होते का? असा सवाल पटोले यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. हे सरकार तीन पक्षाचे आहे. काही मुद्द्यांवर आमदारांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. भाजपकडूनच आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com