Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासतीश उकेंवरील ED कारवाईवरून नाना पटोले आक्रमक; भाजपवर हल्लाबोल

सतीश उकेंवरील ED कारवाईवरून नाना पटोले आक्रमक; भाजपवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर आज सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापा टाकला. सतीश उके यांच्यासोबत त्यांचे भाऊ प्रदीप उके (Pradip Uke) यांना देखील ईडीने ताब्यात घेतले आहे. जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते. सतीश उके यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले असून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार निशाणा साधलाय.

- Advertisement -

‘सौ सोनार की एक लोहार की, आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार’, असा शब्दात पटोले यांनी भाजपला (BJP) थेट इशारा दिला आहे. भाजप जे कटकारस्थान रचत आहे त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं. तसेच भाजपाच्या हिटलरशाहीने लोकशाही धोक्यात असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

भाजपच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात जो कोणी बोलेल, त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) दुरुपयोग करुन कारवाई करुन तोंड बंद करण्याचं पाप हे भाजप जाणीवपूर्वक करतंय. केवळ सतीश उके प्रकरणातच नाही तर अनेक प्रकरणात अशी कारवाई केली जात आहे, असं नाना पटोले म्हणाले.

तसेच, सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण, निमगडे प्रकरण आणि इतर महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या. या फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उके (Satish Ukey) यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. ही धाड मुंबईतील ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांकडून टाकण्यात आली. नागपूरमध्येही ईडीचे कार्यालय आहे.

बॉक्स ऑफिसवर RRR चा दबदबा; The Kashmir Files ला जोरदार टक्कर

मात्र, त्यांना या सगळ्याचा पत्ताही नव्हता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्याकडील फाईल्स आणि त्यांचा मोबाईल जप्त केला आहे. या फाईल्समध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती आहे. मात्र, ईडीचा गैरवापर करून या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या